बेळगावातून 17 फेब्रुवारी पासुन विशेष रेल्वे आयोध्येला निघणार
आयोध्या मध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा उत्साहात पार पडला त्यामुळे आता बेळगावतील नागरिक आयोध्याला रामाच्या दर्शनाकरिता जाणार याकरिता दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने कर्नाटक आणि गोवा अयोध्या धामशी जोडण्यासाठी आस्था स्पेशल एक्सप्रेस विशेष रेल्वे गाड्यांना परवानगी दिली आहे त्यामुळे आता बेळगावातून 17 फेब्रुवारीला विशेष रेल्वे आयोध्येला निघणार आहे.
बेळगाव धारवाड आणि हुबळी मार्गे ही रेल्वे थांबणार असून प्रवाशांनी इंडियन रेल केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन द्वारे तिकीट बुक करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विविध राज्यातून आयोजेकडे जाणाऱ्यांची नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतलाय त्यामुळे बेळगावतून आता 17 फेब्रुवारीपासून विशेष रेल्वे आयोध्याला जाणार आहे.
गाडी क्रमांक 0 6 20 7 ही शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी बेळगावहुन आणि मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी अयोध्येवरून वरून सुटेल. या रेल्वेला 22 डबे असणार आहेत