मारुती गल्लीतील दुकानाला आग: लाखोंचे नुकसान
बेळगाव मधील मारुती गल्लीतील हिदायत शब्बीर शेख चप्पल व स्टेशनरी दुकानाला आग लागली आहे. ही आग 9 वाजण्याच्या सुमारास बंद दुकानाला लागली आहेत. आग नेमकी कशामुळे लागले हे अजून समजू शकलेलं नाहीये. जेव्हा दुकानातून आगीचे लोट आणि धूर बाहेर येऊ लागले त्यावेळी नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
त्यामुळं आग विझविनाकरिता तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आल. आता अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आणि आग विझविण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र दुकानांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे
आगीची घटना घडताच परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंदित करण्यात आलाय. तसेच घटनास्थळी, नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.