नवीन वर्षाच्या सुरुवातीला बेळगाव मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेळगावच्या तानाजी गल्ली येथील
विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे का त्याचा कोणी खून करून त्याला विहिरीत टाकले आहे हा संशय बळावत आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करत आहेत. विहिरीत आढळलेला मृतदेह हा कोणाचा आहे याची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.