समाजसेविका व्ही सुशीला यांनी आज पत्रकार परिषदेत 21 फेब्रुवारी रोजी कित्तूर येथे मीही राणी चन्नम्मा नामक राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.जवळपास 5000 महिला एकत्रित हाणून 21 फेब्रुवारी कित्तूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
कित्तूर आणि चन्नम्मा यांच्या धाडसी लढ्याचे स्मरण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती त्यानी पत्रकार परिषदेत दिली.
कित्तूर मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर देखील सहभागी होणार आहेत तसेच या ठिकाणी सर्व महिला एकत्रित येऊन घोषणापत्र सुद्धा जारी करणार आहेत आणि स्वीकारणार आहेत.
या राष्ट्रीय अभियान कार्यक्रमात बेळगावसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावे विशेष करून कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या जन्म ठिकाण काकती येथून देखील अनेक नागरिक सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शंकर प्रकाश दिलीप कामत यांच्यासह संघटनेचे सदस्य होते.