आर्थिक हिशोबावरून एकावर खुनी हल्ला झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील वरकड येथे घडली आहे या हल्ल्यात बाबुराव गावडे वय 65 हे गंभीर जखमी झाले आहेत यांच्यावर अशोक पाटील यांनी वार केला आहे.
सध्या बाबुराव गावडे यांची प्रकृती चिंताजनक असून हल्ला करणाऱ्यांची हिंडलगा कारागृहात परवानगी करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या वरकड या गावाचा चव्हाटा मंदिराच्या आर्थिक हिशोबावरून हा वाद झालेला आहे.
वरखड येथे बुधवारी रात्री चव्हाट्यावर इतर मंदिराच्या आर्थिक हिशोबाबाबत बैठकीण्यात आली होती या बैठकीत मंदिराची पुजारी बाबुराव गावडे यांनी मंदिराच्या आर्थिक हिशोबाची पडताळणी करून बँकेत जमा असलेल्या रक्कमेबाबत अशोक पाटील यांच्याकडे विचारणा केली तसेच या रकमेचा हिशोब गाव पंच कमिटीकडे जमा करावा अशी मागणी केल्याने मनात राग धरून अशोक पाटील यांनी मीटिंग झाल्यावर घराकडे चाललेल्या बाबुराव गावडे यांच्यावर चाकूने छातीत आणि पाठीत वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी अशोक पाटील याला वरकड मधून अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.