This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*हुंदळेवाडी येथे उभारली पुस्तकांची गुढी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*हुंदळेवाडी येथे उभारली पुस्तकांची गुढी*

गुढी पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेने प्रेरीत होऊन हुंदळेवाडी ता. चंदगड येथील प्राध्यापक श्री रविंद्र बाबुराव पाटील व प्राथमिक शिक्षिका सौ सुजाता रविंद्र पाटील या दाम्पताने आज गुढी पाडवा सण पुस्तकांची गुढी उभा करून साजरा केला .मागील वर्षीही त्यांनी घरासमोर पुस्तकांची गुढी उभी केली होती .

आज मोबाईल च्या युगात वाचन संस्कृती लयाला गेलेली दिसते , बहुतांश तरुण पिढी इंटरनेट वॉटसअप च्या विळख्यात अडकलेली आहे,वाचन खूप कमी झालेले आहे, व्यक्ती व्यक्तींमधील संवाद हरवले आहेत , तरुणांमध्ये एकटेपणा वाढलाय ,नैराश्य रूपी शत्रू चितावनी देतोय, अशा अवस्थेत पुस्तकांशी तरुणांनी मैत्री करायला हवी, पुस्तके वाचनातून ज्ञान समृद्ध होईल , ग्रंथ हेच गुरु आहेत आणि भविष्यातही राहतील ,
भविष्यातील भारताचे स्वप्न पाहताना ज्ञानरुपी शिक्षणाला खूप महत्वाचे स्थान असणार आहे ,तरुणांनी पुस्तकांशी घटट मैत्री करावी , वाचन वाढवावे , ज्ञानसमृद्ध व्हावे , ज्ञानदान करावे,घरातील भावी पिढीला अभ्यासाची शिक्षणाची आवड निर्माण करावी अशा स्वरूपाचे संदेश देत गावातील शाळकरी मुलांना /तरुण वर्गाला वाचनाची सवय लागावी यासाठी गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकांना पुस्तके भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करत समाज जागृतीचे कार्य या दाम्पत्याने केलेले आहे.ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे . प्रा रविंद्र पाटील हे जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडहिंग्लज येथे पत्नी सौ सुजाता पाटील या मराठी विद्यामंदीर किणी ता चंदगड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत .
आई सौ सविता पाटील व वडील श्री बाबूराव पाटील यांच्या प्रेरणेतून सदर उपक्रम राबवण्यात आला .
पाटील यांचे जवळपास सर्व कुटुंबीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून नाविन्यपूर्ण उपक्रमशील कुंटूब म्हणून त्यांची ओळख आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24