बेळगाव :शहरातील वडगाव येथील ढोर गल्लीमध्ये ( स्क्रॅप अड्डयाला ) चोरट्यांनी आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या लागलेल्या भीषण आगीमध्ये स्क्रॅप अड्डयातील लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली असून सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.स्क्रप मध्ये लोखंडी भंगार ,कागद ,वाहनांचे सुट्टे भाग यासह इतर सामान होते.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.