This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हजारो आशा कार्यकर्त्यांचा जिल्हा पंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हजारो आशा कार्यकर्त्यांचा जिल्हा पंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा

बेळगाव जिल्ह्यातील हजारो आशा कार्यकर्त्यांनी आज आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.मोर्चात बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या हजारो कार्यकर्त्या हातात फलक आणि झेंडा घेऊन सहभागी झाल्या होत्या. आशा कार्यकर्त्यांना महिन्याला किमान पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावे.अनेक तांत्रिक अडचणीमुळे केंद्राचे प्रोत्साहन धन देण्यात येत नाही ते त्वरित मिळावे.

केवळ अडीच हजार लोकांची जबाबदारी एका आशा कार्यकर्त्यावर देण्यात यावी.कोविड कालावधीतील विशेष अनुदान अद्याप मिळालेले नाही ते त्वरित देण्यात यावे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईलवर सगळे काम करावे लागते.त्यांना मिळणाऱ्या मानधनात स्मार्ट फोन घेणे परवडत नाही तसेच मोबाईल करन्सी स्वताच्या खिशातून घालावे लागते.मोबाईल आणि करन्सी संबंधी आर्थिक तरतूद करावी.त्यांचे कार्यक्षेत्र सोडून त्यांना दुसरीकडे पाठवू नये. आशा कार्यकर्त्या आरोग्य खात्याच्या आधारस्तंभ बनल्या असून गर्भवती महिला आणि शिशुंची काळजी घेण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.तंत्री दोषामुळे त्यांच्या कामकाजाची नोंद होत नसून केवळ त्यांना सात हजार इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे.यासाठी आशा कार्यकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण त्वरित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आशा कार्यकर्त्यांच्या संघटनेने केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now