बुद्धीबळ शिकू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी : चेकमेट स्कूल ऑफ चेसतर्फे दोन दिवशीय मोफत बुद्धीबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
बेळगाव, दिनांक 19 ( प्रतिनिधी ) : चेकमेट स्कूल ऑफ चेस, बेळगाव या बुद्धिबळाचा खेळ शिकविणाऱ्या बुद्धिबळ संघटनेच्यावतीने दोन दिवशीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 22 आणि शनिवार दिनांक 23 मार्च असे दोन दिवस बेळगाव शहर आणि उपनगरात पाच ठिकाणी हे शिबिर चालणार आहे.
गोवावेस येथील गोवावेस स्विमिंग पूल नजिकच्या सभागृहात सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता, राजवाडा कंपाउंड, आदर्शनगर माधवराव येथे सकाळी 11.30 वाजता, चौथा क्रॉस, सदाशिवनगर-बेळगाव येथील हनीवेल अपार्टमेंटमध्ये सकाळी 11.30 वाजता, अंजनेय नगर बेळगाव येथील लिटल पाम नर्सरी स्कूल येथे दुपारी 4 वाजता तर हनुमान नगर- बेळगाव येथील आकाश चेस क्लास येथे सायंकाळी 6 वाजता हे शिबिर घेतले जाणार आहे .
या शिबिरात शिबिरार्थींना प्रशिक्षित बुद्धिबळ प्रशिक्षकांकडून बुद्धिबळाचे धडे दिले जाणार आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी फिडे सर्टिफाईड ट्रेनर आणि ज्येष्ठ बुद्धीबळ प्रशिक्षक गिरीश बाचीकर, मोबाईल क्रमांक 8050160834 किंवा आकाश मडिवाळर, मोबाईल क्रमांक 8310259025 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.