बेळगाव मधील उपनोंदणी कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे फॅनला आग लागल्याची घटना आज घडली आहे. यावेळी आग लागली तेव्हा कार्यालयात नागरिक कामाकरिता आले होते. कर्मचाऱ्यांनी वेळीच त्यांना बाहेर काढले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच आग विजवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आज उपनोंदणी कार्यालयातील सर्व काम ठप्प करणार असून उद्यापासून कार्यालयातील सर्व कामे सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कार्यालयातील सर्व स्विच वेळीच बंद केल्याने मोठा अनर्थ टळलाय.