मंत्रीच्या मुलाच्या गळ्यात वाघ नखेची चेन आढळल्याने सर्वत्र चर्चा रंगली
वाघाचे पंजे आणि कातडे या प्रकरणाचा तपास राज्यात धुमाकूळ घालत असून, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर यांच्या गळ्यात वाघाचे नख चेन मध्ये दिसले असल्याने हे प्रकरण आता चिघळे आहे .तसेच बेळगाव जिल्ह्यात आता सर्वत्र याबाबतच चर्चा आहे.
राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर यांचा गळ्यात वाघाचे नख असलेले लॉकेट घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मृणाल हेब्बाळकर यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक ठिकाणी फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये वाघाचे नख असलेले लॉकेट सापडले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मौनामुळे शंका निर्माण झाली आहे. तसेच बेळगावच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मौनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.