This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*चाकू हल्लाप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजप कार्यकर्त्यावर चाकू हल्लाप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप एससी मोर्चाचे पदाधिकारी पृथ्वी सिंह (वय ५४) यांच्यावर सोमवारी दुपारी चाकू हल्ला झाला होता.

त्यानंतर जयनगर, हिंडलगा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर रात्री उशिराने पाच जणांवर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सुनील जाधव, सद्दाम यांच्यासह आणखी दोघांवर एपीएमसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

भादंवि १४३, १४७, १४८, ३२३, ३२४, ३७९, ५०४, ५०६ आणि एससीएसटी अॅ क्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वी सिंह यांच्यावर चाकू हल्ला झाला. त्यामध्ये ते जखमी झाले.

यानंतर त्यांना खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार केले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे,

या घटनेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now