महिलांकरिता आयोजित बाईक रॅली उत्साहात संपन्न
एंजल फाउंडेशन आणि डी मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानने आपली भारतीय संस्कृती टिकावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या बाईक रॅलीमध्ये महिलांनी विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केला होता.
बाईक रॅलीचे उद्घाटन कॅम्प च्या पीएसआय रुक्मिणी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले त्यानंतर ही बाईक रॅली महिला विद्यालय कॉलेज रोड कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल कॉलेज रोड छत्रपती संभाजी चौक परत कॉलेज रोड करून महिला विद्यालय या मार्गावर फिरून बाईक रॅलीची सांगता झाली
त्यानंतर विद्यालयाच्या सभागृहामध्ये या बाईक रॅलीमध्ये सहभाग झालेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला .
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅम्प पोलीस स्थानकाच्या सीपीआय रुक्मिणी मॅडम व भाजप महिला मोर्चा राज्य सेक्रेटरी उज्वला बडवाणाचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर सामाजिक कार्यकर्ते अवधूत तूडयेकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक रेखा हट्टीकर यांना पाच हजार रुपये रोख बक्षीस तसेच द्वितीय क्रमांक श्वेता चौगुले 3000 रुपये व तृतीय क्रमांक कविता मुकुंद यांना दोन हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके फाउंडेशनच्या अध्यक्षा मॉलिशका पवार, डी मिडीयाचे सर्वेसर्वा दीपक सुतार, प्रज्ञा शिंदे मिलन पवार भारती बुडवी, कमल कोलंबसकर जया देसाई माया बडगे पृथ्वीराज शेरेकर वसंत कोलकार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मिस्त्री यांनी केले