बेळगावातील वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात बसच्या मागील चाकाखाली सापडून 60 वर्षाची वृद्ध महिला ठार झाली.अत्यंत वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकात हा अपघात घडल्याने काही काळ गोंधळ उडून वाहतुकीची कोंडी झाली होती. परगावाहून बेळगावला कामानिमित्त आलेल्या महिलेला बसची धडक बसून मागच्या चाकाखाली सापडल्याने वृद्ध महिला जागीच ठार झाली.
चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.नंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.बेळगाव उत्तर वाहतूक पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.