विजापूर जिल्ह्यात इंडि तालुक्यात गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
बिराप्पा निंगापा अवरादी वय 15 असे वीज पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. विजापूर मध्ये झालेल्या विजेच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पावसाचा बचाव करण्याकरिता बिरापा एका झाडाखाली उभा राहिला होता त्याचवेळी वीज त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
बिराप्पा हा गुरुवारी संध्याकाळी मेंढ्या चालण्यासाठी शहराबाहेर गेला होता यावेळी ही दुर्घटना घडली या घटनेची नोंद इंडी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे