बेळगाव, विजापूर, हुबळीसह राज्यातील विविध ठिकाणी २७,०६७ रोजगार निर्माण करणाऱ्या १७,८३५.९ कोटींच्या योजनांना राज्य उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली. बेळगावात ५,९०० कोटी खर्चुन पंपड् वॉटर स्टोअरेज विकास आणि अथणी शुगर्सच्या डिस्टिलरीच्या विकासासाठी २०५ कोटींच्या योजनेचा यामध्ये समावेश आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये ८,२२०.०५ कोटींच्या सहा नव्या योजना असून ९,६१५.८५ कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करण्याच्या ८
योजना आहेत. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, बळ्ळारी येथे नव्याने गुंतवणूक, अतिरिक्त गुंतवणूक असणाऱ्या एकूण ८ योजनांना मंजुरी मिळाली आहे. याद्वारे एकूण १०,४३३.७२ कोटींची गुंतवणूक उत्तर कर्नाटकात होणार आहे.
विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे कोलारमधील नरसापूर औद्योगिक परिसरात २०९५ कोटींतून स्मार्ट फोन उत्पादन कंपनी सुरु करण्यात येणार आहे. यामार्फत २१,७२३ जणांना रोजगार मिळणार आहे. बालाजी शुगर्स आणि केमिकल्स, एअर इंडिया मिलिटेडतर्फे ८,२२०.०५ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.