This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*5 ही हमी योजनांच्या आश्वासनांची पूर्तता*

*5 ही हमी योजनांच्या आश्वासनांची पूर्तता*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कर्नाटकच्या जनतेने बहुमताने काँग्रेसला निवडून देऊन सन्मान केला आहे. काँग्रेसनेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली पाचही हमी योजनांच्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यामुळेच जनतेचा काँग्रेसवरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

निपाणी तहसील, तालुका पंचायत आणि नगरपालिकेतर्फे मंगळवारी येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात आयोजित हमी योजनेतील लाभार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.मंत्री जारकीहोळी म्हणाले, राज्यात काँग्रेसने हमी योजना अंमलात आणून इतिहास रचला आहे. सिद्धरामय्या सरकार पुढील काळात आणखी नवीन योजना राबविणार आहे.

त्यानंतर माजी आ. काकासाहेब पाटील यांनी,
निवडणूक काळात काँग्रेसने दिलेल्या
आश्वासनांबाबत भाजपने टीका केली होती. पण काँग्रेसने सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. काँग्रेसने सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे.माजी आ. वीरकुमार पाटील म्हणाले,जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे.

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, राज्यातील कोट्यवधी लोकांना सरकारच्या हमी योजनांचा लाभ मिळत आहे. मात्र, भाजपने सरकारच्या विरोधात प्रचारचालविला आहे. विरोधकांनी अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करू नये असे सांगितले.
माजी जि. पं. सदस्य राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे, सुप्रिया पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास प्रांताधिकारी मेहबुबी,गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, निपाणी ब्लॉक ■ काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, निपाणी महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा वर्षा चव्हाण, • अण्णासाहेब हवले, माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, युवानेते सूजय पाटील, उद्योजक रोहन साळवे, निकू पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, नगरसेवक अरुण आवळेकर आदी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24