बेळगांव:जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कार्य तत्परता येळ्ळूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या भीमा कोरेगाव स्मारकाचे भूमिपूजन नुकताच पार पडले. हे भूमिपूजन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमान सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, येळ्ळूर यांच्या वतीने मैदानाचा विकास करण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे निधी मंजुरीसाठी निवेदन देण्यात आले.
येळ्ळूर ग्रामपंचायतीकडून सदर शाळेच्या नावाने गायरान जागेतील दोन एकर जागा शाळेला मैदान साठी देण्यात आली आहे. या मैदानाचा विकास करण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत तसेच शाळेचे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष व सदस्य यांनी अनुदानासाठी निवेदन दिले. याची दखल घेऊन जिल्हा पालकमंत्री श्रीमान सतीश जारकीहोळी यांनी लगेच 25 लाखाचा निधी मंजूर केला. त्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते.