*19 व्या आशियाई रोलर स्केटिंग* *चॅम्पियनशिप 2023 साठी बेळगावच्या 2* *स्केटर्सची निवड*
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे 2 स्केटर *यशपाल* *पुरोहित आणि मंजुनाथ* *मंडोळकर* यांची चीन येथे 16 ते 23 ऑक्टोबर 2023 दरम्यान आयोजित प्रतिष्ठित 19 व्या आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
*मंजुनाथ मंडोळकर*
गेली 17 वर्ष तो स्केटिंग क्षेत्रात आहे तो 5 वेळा राष्ट्रीय पदक विजेता असून 15 वेळा कर्नाटकचे प्रतिनिधीत्व केला आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये चमक दाखवण्या साठी भरपूर परिश्रम घेतली आहे. मंजुनाथ आनंदवाडी बेळगाव येथे राहत असून या स्पर्धेसाठी त्याची तयारी पूर्ण झाली आहे
*यशपाल पुरोहित*
स्केटिंगमध्ये गेली 10 वर्षे परिश्रम घेत असून गेल्या ६ वर्षांपासून तो कर्नाटकचे प्रतिनिधीत्व करत आहे, गेल्या ३ वर्षांपासून त्याची टीम इंडिया कॅम्पमध्ये निवड झाली होती यावेळी त्याला
प्रतिष्ठित 19 व्या आशियाई स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली यासाठी तो खूप मेहनत घेत आहे तो कुलकर्णी गल्ली बेळगाव येथे राहत असून त्याला त्याचे वडील चौकसिंग पुरोहित यांचे प्रोत्साहन मिळत आहे
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही स्केटिंगपटू के एल ई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर, कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकाडमी गोवावेस सराव करतात
डॉ प्रभाकर कोरे, श्री अभय पाटील आमदार बेळगाव दक्षिण, शाम घाटगे, राज घाटगे, नरेश शर्मा सरचिटणीस आरएसएफआय इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सदस्य, स्केटिंगपटू आणि पालक यांचे प्रोत्साहन लाभत आहे