This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जिजामाता हायस्कूलच्या 1999 ते 2010 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*

*जिजामाता हायस्कूलच्या 1999 ते 2010 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिजामाता हायस्कूलच्या 1999 ते 2010 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

जिजामाता हायस्कूलच्या 1999 ते 2010 पर्यंतच्या दहावीच्या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या स्नेह मेळाव्यात जिजामाता हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या.

कित्येक वर्षानंतर सर्व मैत्रिणी एकत्रित भेटल्या असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाराचा आनंद यावेळी पाहायला मिळाला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मुळेच आम्ही आता सध्या उच्च स्तरावर पोहोचलो असून स्वतः स्वावलंबी झालो असल्याने यावेळी आपल्या शिक्षकांची पाद्य पूजा करून त्यांचा सत्कार केला आणि आशीर्वाद घेतला.

यावेळी शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपण सर्वजण इतक्या वर्षानंतर भेटलो असल्याने आनंद व्यक्त केला आणि शिक्षकांना तसेच मैत्रिणींना भेटण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने आभार मानले.

यावेळी सर्वांनी एकत्रित येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच लहानपणीच्या काढलेल्या खोड्या केलेली मस्ती भांडणे आठवून एक वेगळ्याच प्रकारची मज्जा मस्ती पुन्हा या स्नेह मेळाव्या दरम्यान केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24