रस्त्यावरून जाणाऱ्या बकऱ्याना भरधाव ट्रकने धडक दिल्याने सतरा बकरी जागीच ठार झाली.बेळगाव जवळील हलगा गावाच्या जवळील पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. ट्रकखाली बकरी चिरडल्याने रस्त्यावर त्यांचे मांस आणि रक्त रस्त्यावर पसरले होते.घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.काही बकरी जखमी झाली होती.
जखमी बकऱ्यावर पशुवैद्याना बोलवून घटनास्थळी त्यांच्यावर उपचार करण्यात आले.रमा पुजेरी हा मेंढपाळ आपली बकरी घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरून जात होता.त्यावेळी कुत्र्याच्या भीतीने काही बकरी धावत राष्ट्रीय महामार्गावर आली.यावेळी भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना ठोकरले आणि सतरा बकरी चिरडून मृत झाली. सतरा बकरी ठार झाल्यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून त्याला सरकार कडून मदत मिळावी अशी मागणी धनगर समाजाने केली आहे.