चोरट्यांकडून 14 लाखाचा मुद्देमाल लंपास
गोंधळी गल्ली येथे चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून 24 तोळे सोने आणि एक लाख तीस हजार रुपये असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना गोंधळी गल्ली येथे उघडकीस आली आहे या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
चोरट्यांनी गोंधळी गल्ली येथील रहिवासी असणारे चेतन कुरणे यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांच्या घरामध्ये कुलूप तोडून प्रवेश केला आणि धाडसी चोरी केली ही घटना चेतन कुरणे यांना आज सकाळी ते घरी परतले असता ही गोष्ट निदर्शनास आली तेव्हा त्यांनी लागलीच ही माहिती पोलिसांना देऊन तक्रार नोंदविली.
नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच ठसे तज्ञांना पाचारण करत श्वानपतकालाही पाचारण केले. यावेळी श्वान गवळी गल्ली गोंधळी गल्ली या परिसरात घुटमळत होते. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून त्याचा मागोवा देखील घेत आहेत