पुणे बंगलोर महामार्गावर कोगनोळी येथे उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून चौदा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी येथे तपासणी नाका उभारण्यात आला आहे.या तपासणी नाक्यावर गुरुवारी मध्यरात्री साताऱ्या हून बंगलोर कडे निघालेल्या बसची तपासणी केली असता एका प्रवाशाकडे चौदा लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी चौकशी केली असता त्या प्रवाशाकडे त्या रक्कमेच्या संदर्भात कोणतीही कागदपत्रे मिळाली नाहीत.त्यामुळे पोलिसांनी चौदा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.चौदा लाख रुपये घेऊन निघालेल्या प्रवाशाचे नाव निसार सुना (५५) असे असून तो बंगलोर येथील लाकडाचा व्यापारी आहे.