खानापूर तालुक्यातील होनकल येथील एका शेतवडीत अबकारी खात्याच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटीच्या दारुची विल्हेवाट लावण्यात आली आहे .अंदाजे दिड कोटीं रूपये किंमती दारूची विल्हेवाट आल्य असल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डिसेंबर 2022 पासून ते डिसेंबर 2023 पर्यंत अबकारी खात्याने विविध ठिकाणी छापे मारून ,अन्य ठिकाणी कारवाई करून जप्त केलेल्या दारूचा साठा आज नष्ट केलाय.72 प्रकरणामध्ये दहा हजार तीनशे लिटर गोवा बनावटीची आणि 135 लिटर गावठी दारू साठा नष्ट करण्यात आलाय.