कंग्राळी बुद्रुक पाहिला क्रॉस मराठा कॉलनी शास्त्रीनगर येथील शिवनेरी युवक मंडळाच्या वतीने खास दीपावली निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.
यावेळी झालेल्या चित्रकला स्पर्धा स्मरणशक्ती स्पर्धा संगीत खुर्ची किल्ले स्पर्धा रांगोळी चित्रकला स्पर्धा यामध्ये बक्षीस मिळविलेल्या विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी किल्ले गौरव पुरस्कार म्हणून कुरीगड किल्ला राजहंस गड पन्हाळा गड साकारलेल्या युवकांना देण्यात आला तर स्मरणशक्ती स्पर्धेमध्ये खुशी बर्डे हिने प्रथम क्रमांकाचे आणि अंजली हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये तनुश्री पाटील आणि भूमी हजरे यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविला.
त्याचप्रमाणे संगीत खुर्चीमध्ये रुजण पाटील आणि भूमीराज हरजे यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविला. यावेळी सर्व विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.