समाजाच्या उन्नतीसाठी झाली विश्वकर्मा सेवा संघाची स्थापना
बेळगांव :रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी श्री विश्वकर्मा सेवा संघ या संघटनेची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाला विश्वकर्मा समाजातील सर्व लोक मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील उपस्थित होते तसेच एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मीना बेनके मॅडम ग्रामीण चे माजी आमदार श्री संजय पाटील उद्योगपती महादेव चौगुले नागेश लोहार संजय सुतार समाजसेवक संतोष जैनोजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या समस्या आमदार साहेबांसमोर मांडण्यात आल्या व आमदार साहेबांनी त्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे इतरही सरकारी सुविधांच्या सवलती देण्याची शाश्वती दिली या कार्यक्रमात विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या वयोवृद्ध व्यक्तींचा गुणी विद्यार्थ्यांचा यशस्वी उद्योजकांचा निवृत्त सैनिकांचा डॉक्टर इंजिनीयर पत्रकार तसेच अभिनय क्षेत्राशी निगडित कलाकार या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
तसेच श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या फलकाचे आमदार अभय पाटील साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
श्री विश्वकर्मा सेवा संघ बेळगाव चे निश्चित करण्यात आलेले कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे.
अध्यक्ष – श्री रमेश प्रकाश देसुरकर
उपाध्यक्ष – श्री हनुमंत बाबुराव लोहार
सेक्रेटरी – श्री राजू रवळनाथ सुतार
उपसेक्रेटरी- श्री संदीप सुरेश मंडोळकर
खजिनदार – श्री अनिल नागेश मुचंडीकर
उपखजिनदार – श्री ज्योतिबा देवेंद्र लोहार
सभासद
श्री अरुण मल्लाप्पा देसुरकर
श्री राजेश गणपती लोहार
श्री चंद्रकांत गजानन लोहार
श्री दीपक चंद्रकांत सुतार
श्री महेश बाबुराव लोहार
श्री संतोष चंद्रकांत सुतार
श्री प्रदीप आत्माराम सुतार
श्री सुरेश बसवा आणि सुतार
श्री नामदेव लोहार
श्री प्रशांत बेळगावकर
श्री सुरेश सुतार
श्री विनायक गुंडू लोहार
श्री भूषण मोहन लोहार
श्री गणपती फकीरा सुतार
श्री महादेव बाबुराव लोहार
कार्यकर्ते
श्री सागर लोहार
श्री सचिन बापू सुतार
श्री मनोहर सुतार
श्री विशाल लोहार
व इतरही अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारी मंडळाने व सभासद कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.
[या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेळगाव मधील मराठी चित्रपट लेखक दिग्दर्शक श्री संतोष चंद्रकांत सुतार यांनी केले.