कंग्राळी खुर्द येथील मसनाई देवीची जत्रा उत्साहात
सालाबाद प्रमाणे यावर्षीही मार्गशीर्ष महिन्यात मसनाई देवीची यात्रा कंग्राळी खुर्द येथे उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त पहिल्या दिवशी म्हणजे काल देवीच्या मुखवट्याची मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली तसेच मिरवणुकी दरम्यान देवीवर भंडाराची उधळण करण्यात आली.
https://fb.watch/hqj7F5Czz2/
यावेळी देवीला पहिल्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर आज सकाळपासून देवीचे दर्शन करिता कंग्राळी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती
तसेच आज देवीला तिखट म्हणजे बकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी सायंकाळ नंतर देवीच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी झाली होती.