This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

संपूर्ण राष्ट्रगान अभियान उत्साहात 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

संपूर्ण राष्ट्रगान अभियान उत्साहात

 

दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी अनगोळ संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन आणि संपूर्ण राष्ट्रगान अभियान उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण राष्ट्रगान अभियांतर्गत राष्ट्रगीत गायले गेले. आणि शाळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्रीमती अलकाताई इनामदार, श्री किशोर काकडे व मेजर दीपचंद्र सिंह उपस्थित होते. तसेच शाळेचे अध्यक्ष श्री परमेश्वर हेगडे, शाळेचे सेक्रेटरी श्री सुधीर गाडगीळ, प्रशासक श्री राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता दफ्तरदार, उपमुख्याध्यापिका श्रीमती ऋतुजा जाधव, शाळेचे व्यवस्थापन सदस्य, जनकल्याण संस्थेचे सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते.

पुढील कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलींच्या संस्कृत समूहगीताने झाली. पृथ्वीराज शिंदे व गौसीया माडीवाले यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या शब्दातून व्यक्त केले. मेजर दीपचंद्र सिंह व त्यांची कमांडो टीम या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

प्रमुख पाहुण्या श्रीमती अलकाताई इनामदार यांनी देशाच्या हितासाठी जगता आलं पाहिजे हे आपल्या शब्दातून उपस्थितीला पटवून दिले. व्यवस्थापक श्री किशोर काकडे यांनी मधुर गाण्यातून उपस्थितांना संदेश दिला. मेजर दीपचंद्र सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे अध्यक्ष श्री परमेश्वर हेगडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दृष्टी धन्ना, अदिती हिरेमठ आणि साहिल गुडेकर याने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now