नदीत बुडालेल्या त्या युवकाचा मृत देह आढळला
मलप्रभा नदीत बुडालेल्या त्या युवकाचा मृत देह आज सकाळी हाती लागला. अल्ताफ नावाच्या पट्टीच्या पाहणाऱ्या युवकांनी हा मृतदेह शोधण्याचे काम हाती घेतले. तसेच त्याला मृतदेह सापडल्यानंतर त्याने मृतदेह नदी पात्रा बाहेर काढला.
सुनील चंद्रपा तलवार हा युवक काल दुपारी मलप्रभा नदीत बुडाला होता. त्यानंतर अग्निशमन दराने त्याला शोधण्याचे आता प्रयत्न केले मात्र यात ते अपयशी ठरले परंतु आज सकाळी सुनील चा मृतदेह शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आणि ते पात्र बाहेर देखील काढले.
मृत युवकाच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. मृतदेह बाहेर काढल्यावर खानापूर पोलीस व अग्निशमन दलाच्या वतीने पंचनामा करण्यात आला.