This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अचानक अवकाळी पावसाने बेळगावत लावली हजरी*  *ढगाळ वातावरण होऊन अवकाळी पाऊस (Unseasonal rain) हजेरी लावली : अचानक अवकाळी पावसामुळे सर्वांचीच उडाली तारांबळ .* 

<span class=*अचानक अवकाळी पावसाने बेळगावत लावली हजरी*  *ढगाळ वातावरण होऊन अवकाळी पाऊस (Unseasonal rain) हजेरी लावली : अचानक अवकाळी पावसामुळे सर्वांचीच उडाली तारांबळ .* " title="*अचानक अवकाळी पावसाने बेळगावत लावली हजरी*  *ढगाळ वातावरण होऊन अवकाळी पाऊस (Unseasonal rain) हजेरी लावली : अचानक अवकाळी पावसामुळे सर्वांचीच उडाली तारांबळ .* " decoding="async" srcset="https://dmedia24.com/ichawhoo/2024/03/20240322_160943-scaled.jpg 2560w, https://dmedia24.com/ichawhoo/2024/03/20240322_160943-300x169.jpg 300w, https://dmedia24.com/ichawhoo/2024/03/20240322_160943-1024x576.jpg 1024w, https://dmedia24.com/ichawhoo/2024/03/20240322_160943-768x432.jpg 768w, https://dmedia24.com/ichawhoo/2024/03/20240322_160943-1536x864.jpg 1536w, https://dmedia24.com/ichawhoo/2024/03/20240322_160943-2048x1153.jpg 2048w" sizes="(max-width: 2560px) 100vw, 2560px" />
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव तारीख 22 मार्च 2024 : मागील चार दिवसांपासून दुपारपर्यंत तापते आणि सायंकाळी ढगाळ वातावरण होऊन अवकाळी पाऊस (Unseasonal rain) हजेरी लावत आहे. अचानक अवकाळी पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. बेळगाव शहरासह इतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा जोर दिसून आला. दररोजच्या हवामानातील बदलामुळे हा अचानक पाऊस पडल्यामुळे सर्वांनाच पाण्याच्या प्रश्न सुटेल अशी आशा वाटू लागली आहे. शहरात असणाऱ्या पाणीटंचाईची समस्या मोठी भेडसावत असतानाच हवामानातील बदलामुळे पाऊस आज जागतिक जलदिन असून याच दिवशी साडेचार वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

बेळगाव शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी दुपारी 4 :30 वाजताच्या सुमारासही अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यासोबतच बेळगांव , खानापुर यासह इरत तालुक्यात देखील तालुक्यातही मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने शेतकर्‍यांच्या आणि सर्वांनाच पाणी टंचाईची समस्या दूर होईल अशी अशा वाढली आहे.

बेळगाव येथे जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने (Unseasonal rain) चांगलेच झोडपले. यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर काही घरांची पडझड झाली. पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर सकाळच्या सुमारास कडक उन्ह तापून चटके बसत असतानाच, दुपारी 4:30 च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास जोरदार बरसलेल्या या पावसाने रस्त्यावरील वाहनधारक व विक्रेते यांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने उभी करून मिळेल त्या ठिकाणी आसरा शोधला.

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअच्यावर गेला होता. त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे उच्चांक गाठत असलेला तापमानाचा पारा घसरला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर, या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) त्यामुळे हाती येणारे उत्पन्न गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याने शेतकर्‍यांच्या चितेंत पुन्हा भर पडली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24