राजहंसगडावरील शिवमुर्तीचे लवकरच लोकार्पण
युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी राजहंस गडावर बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पाहणी केली आणि लवकरच मूर्तीचे उद्घाटन करून लोकार्पण सोहळा अगदी थाटामाटात करू असे यावेळी उपस्थित त्यांना सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील पुणे येथून आलेल्या नियोजक गडावरती मूर्ती कामाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. समस्त जनतेच्या मागणीनुसार बेळगाव तालुक्यातील व ग्रामीण मतदार संघातील राजहंस गड या किल्ल्यावरती जगातील सर्वात मोठी आणि उंच मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची बसविण्यात आहे.
त्यामुळे बेळगाव वासियांचा अभिमानाने डौलणार असल्याचे यावेळी युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. तसेच लवकरच बेळगाव ग्रामीण मधील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.