कुरली येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा,घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बैलजोड्या आणि घोडे सहभागी झाले होते.प्रारंभी बैलगाडा शर्यत पार पडली.या शर्यतीत माणकापूर येथील सुनील महांकाले यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.घोडागाडी शर्यतीत राम पोलीस यांच्या घोड्यांच्या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला.ही शर्यत पाहण्यासाठी शेकडो शौकीन उपस्थित होते.शर्यतीच्या वेळी दुचाकी वाहने घेऊन हाकारे घालत बैलांना आणि घोड्यांना जोरात पळवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.बैलगाडा,घोडागाडी,बैल घोडा अशा वेगवेगळ्या शर्यती चुरशीने पार पडल्या.बैलगाडा शर्यती तीतील विजेत्यांना एकवीस हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.