कार्तिकउत्सव निमित्त होणार जोतिबा मंदिरात होणार महाप्रसाद
सालाबादप्रमाणे यावर्षीही 65 व्या वर्षानिमित्त नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये कार्तिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता जोतिबा देवाला 65 नद्यांचा जलाभिषेक रुद्राअभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर होम हवन करण्यात येणार आहे तर सकाळी अकरा वाजता सत्यनारायण पूजा आणि 12 वाजता महाआरती संपन्न होणार आहे.
तसेच रात्री आठ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घेऊन महाप्रसादाला उपस्थित रहावे असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.