शालेय विद्यार्थ्यांना रहदारी वाहतूक नियमांची माहिती
शालेय विद्यार्थ्यांना रहदारी वाहतूक पोलीस यांचे नियम माहिती व्हावेत याकरिता कर्नाटक राज्य पोलीस यांच्या वतीने सरदार हायस्कूल मधील आठवीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांचे नियम सांगण्यात आले.
तसेच एखादा अपघात घडल्यास अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचार द्यावे याबद्दल माहिती देण्यात आली तसेच अठरा वर्षावरील मुलांनीच दुचाकी चालवावीताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
यासोबतच विद्यार्थ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट किती महत्त्वाचे आहे हे देखील यावेळी सांगण्यात आले. त्याशिवाय हँड सिग्नल आणि डिजिटल सिग्नल याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला ट्रॅफिक पोलिसाचे पोलीस निरीक्षक केम्पनावर, सिद्धारूढ , खडे बाजार पोलीस स्थानकाचे पीएसआय आनंद आनगोंड, पीएसआय किरण व्हनकट्टी हवालदार आडव्याप्पा नावी यांच्यासह सरदार हायस्कूल मधील विद्यार्थी उपस्थित होते.