This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हजरत निजामुद्दिन एज्युकेशन आणि वेलफेर ट्रस्ट तर्फे स्वतंत्रा दिन साजरा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हजरत निजामुद्दिन एज्युकेशन आणि वेलफेर ट्रस्ट तर्फे स्वतंत्रा दिन साजरा

बेळगाव वडगांव विष्णू गल्लीतील हजरत निजामुद्दिन एज्युकेशन आणि वेलफेर ट्रस्ट तर्फे स्वतंत्रा दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वडगांव निजामिया जामिया सुन्नत जमातचे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. राँबिन टेर्डस चे मालक गौसभाई हत्तरकियाल हे प्रमुख अतिथीपदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी गौसभाई हत्तरकियाल म्हणाले की, स्वतंत्र मुक्त भारताला आणखीन अधिक सुंदर बनविण्यासाठी आम्ही सर्व भारतीय आहोत याची भावना प्रत्येक देशवासींच्या मना मध्ये बसविली पाहिजे. भारताला जगात सुंदर, सुदृढ ,प्रगतिशील आणि बलिष्ठ देश म्हणून प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न सर्व भारतीयांनी करून देशात शांती, सलोखा आणि एकात्मता टिकून ठेवली पाहिजे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना अहमद नदाफ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. उर्दू शाळेच्या मुलीने सुंदर देशभक्ती गीते प्रस्तुत केली. या समारंभाला हजरत निजामुद्दिन एज्युकेशन आणि वेलफेर ट्रस्टचे अध्यक्ष समीर सुतार, फैयाज सौदागर ,यासीन सनदी, आबीद शेख,आसिफ जकाती, जावेद सय्यद, अशरफ मदरंगी,मलीक इप्पेरी, मुस्ताक दड्डी,मंझूर तिगडी,इमामहुसेन नालबंद, इरफानपाशा, सलमान दंडावत,रफिल जमादार,शहबाज तहसिलदार आदि सदस्य उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now