This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हेरे सरंजामप्रश्नी हेरे सजात उद्या शिबीर :* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*हेरे सरंजामप्रश्नी हेरे सजात उद्या शिबीर :*

*मा. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण व्ही.के.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शन नुसार व मा.जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये हेरे सरंजामच्या शेतकऱ्यांसाठी हेरे येथे शुक्रवार दि.18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत रवळनाथ मंदिर मध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे.*

*शिबिरावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, मंडळ अधिकारी अरुण शेट्टी व त्या विभागाचे तलाठी तेजस्विनी पाटील महसूल कर्मचारी हजर राहून शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाही करणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले सातबारा विहित नमुन्यातील अर्ज घेऊन हजर रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार हेरे सजातील हेरे, मोटनवाडी या गावातील लोकांनी वेळेत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा.*

*शिबीर उदघाटन प्रसंगी उपस्थित राहतील*

मा.शिवाजीराव पाटील अध्यक्ष, स्वामी प्रतिष्ठान, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख मा. भरमू अण्णा पाटील ,माजी राज्यमंत्री मा. बाबासाहेब वाघमोडे,प्रांताधिकारी गडहिंग्लज मा. राजेश चव्हाण, तहसीलदार चंदगड मा. सचिन बल्लाळ, जि प सदस्य मा. नामदेव पाटील ,तालुका अध्यक्ष मा. शांताराम पाटील, मा. सभापती मा. जयश्री आप्पाजी गावडे ,सरपंच हेरे   तसेच प्रमुख पदाधिकारी , महसूल कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24