मन्नूर गावामध्ये जवळपास 180 कुटुंबीयांना मोफत गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून गरीब महिलांकरिता उज्वल योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर शेगडी पाईप रेगुलेटर यासह अनेक साहित्य गरिबांना वितरित केल्या जात आहेत त्याचप्रमाणे मन्नूर येथील गावात देखील मोफत गॅसचे वितरण करण्यात आले.
यावेळी खासदार मंगला अंगडी व राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी विश्वनाथ चौगुले बाळू पाटील अनिल पाटील रवींद्र चौगुले धनंजय जाधव विनय कदम यांच्यासह कल्लेहोळ सुळगा मन्नूर आंबेवाडी अतिवाड बेकिनकेरे बेनकनहळळी या गावातील लाभार्थी उपस्थित होते.