This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

॥ कंग्राळी खुर्द येथे मा . आ. कै. बी.आय पाटील चषक क्रिकेट स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन ॥

॥ कंग्राळी खुर्द येथे मा . आ. कै. बी.आय पाटील चषक क्रिकेट स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन ॥
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

॥ कंग्राळी खुर्द येथे मा . आ. कै. बी.आय पाटील चषक क्रिकेट स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन ॥
तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती
कंग्राळी खुर्द – येथील मराठा साम्राज्य स्पोर्टस क्लब आयोजित मा.आ. कै . बी.आय. पाटील चषक हाफपीच दिवस रात्र क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवून स्पर्धांचे उद्घाटन केले .
श्री मसणाई देवी यात्रेनिमित आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धा उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक श्री आर.आय पाटील होते सुरवातील ग्रा.प अध्यक्ष यल्लापा पाटील व मा अध्यक्ष भाऊ पाटील यांनी गावच्या वेशीतील अश्वारूढ शिवमुर्तीचे पूजन केले . श्री मरगाई व श्री मातंगी देवी पूजन मा. ता . प अध्यक्षा अर्चना अलगोंडी व ग्राप उपाध्यक्षा ज्योती पाटील यांनी अन्य महिलां ग्राप सदस्या समवेत केले . मा आ. कै बी आय पाटील फोटो पूजन आंबेवाडी ग्राप अध्यक्ष चेतन पाटील व अन्य मान्यवर , शहिद जवान वामन जाधव फोटो पूजन बीके कंग्राळी उपाध्यक्ष यल्लोजी पाटील मा. अध्यक्ष व विद्यमान सदस्य दत्ता पाटील जयराम पाटील सय्यद बंदेनवाझ यांनी केले, सरस्वती फोटो पूजन मा.प्रा. पौर्णिमा पाटील , मा. जि.प सदस्या सरस्वती पाटील व क्रांती बोबटे यांनी तर गणेश पूजन तालुका म . ए समिती चिटणीस अँड एमजी पाटील व अन्य समिती नेत्यांनी केले . व्यासपीठावरील शिवरांयांच्या मुर्तीचे पूजन युवा नेते आर एम चौगुले , मंगेश बाळेकुंद्री यांनीं अन्य मान्यवरां सोबत केले तर दिप प्रज्वलन गावतील ग्राप सदस्यानी केले त्यानंतर योगेश पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे शाब्दीक स्वागत करून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते फेटे बांधून बुके देऊन सन्मान केला . यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त करतांना खेळामुळे तरुण पिढी निरोगी व निर्व्यसनी होते त्यामुळे सर्वच खेळांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे सांगितले . शेवटी प्रत्यक्षात मैदानात नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या समवेत महिला प्रतिनिधींनी चषक अनावरण केले तर यष्टी पूजन नगर सेवक श्रेयस नाकाडी समवेत अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष स्पर्धाना प्रारंभ झाला . पहिला सामना ब्ल्यू इलेव्हन विरुद्ध स्टार इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किसन पाटील यांनी तर ग्राप सदस्य प्रशांत पाटील यांनी आभार मानले . यावेळी क्रिकेट प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
* या वेळी कार्यक्रम अध्यक्ष आर . आय . पाटील यांचा मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झालेने सत्कार करण्यात आला .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24