॥ कंग्राळी खर्द ग्रामस्थांचे पश्चीम महाराष्टू देवस्थान कमिटीला निवेदन ॥
यात्रा काळात सासनकाठी व भक्तांना निवासासाठी जागा उपलब्धतेबाबत मागणी
कंग्राळी खुर्द – या गावच्या ग्रामस्थांच्या वतिने पश्चीम महाराष्टू देवस्थान समितीला निवेदन देण्यात आले असून श्री जोतीबा यात्रा काळात सासनकाठी व भक्ताना निवासांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे .
शेकडो वर्षांचा परंपरेप्रमाणे या गावची सासनकाठी व भक्त श्री जोतीबा यात्रेला जातात .
तेथे गट क्रमांक 7 मध्ये 40X30 जागेत या गावची सासनकाठी व भक्तगण यात्रेवेळी पाच दिवस वास्तव करून राहतात परंतू गेल्या वर्षापासून काही स्थानिक लोक त्या ठिकाणी राहण्यास अटकाव करत आहेत .आता यात्रा या पौर्णिमेला होणार असलेने ग्रामस्यांच्या वतिने अध्यक्ष यल्लापा पाटील सदस्य प्रशांत पाटील , यशोधन तुळसकर , वैजनाथ बेन्नाळकर , राकेश पाटील मानकरी वाय आर पाटील , मनोहर पाटील भटजी श्री सांगळे आदींनी पश्चीम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडे यात्रा काळात सदर जागा आम्हाला परंपरेप्रमाणे मिळावी आम्ही नियमा प्रमाणे भू भाडे भरणार असल्याचे निवेदन दिले .
कमिटीच्या वतिने कमिटी सचिव श्री शिवराज नाईकवडी तसेच वरीष्ठ लिपीक मेहतर साहेब यांनी स्वीकारले असून आम्ही योग्य ती कारवाई करून तुम्हाला यात्रा काळात जागा मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिले तसेच अटकाव करणार्यांनाही समज दिली जाईल असे सांगिलते . कमिटीचा या आश्वासनामुळे भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .