विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा आणि त्यांनी कोणत्या गडावर कोणती शौर्यगाथा केली आहे. कोणते पराक्रम केले आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याकरिता सहलीचे आयोजन केले होते.
मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास समजावा याकरिता सज्जनगड, रायगड, प्रतापगडची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांकरिता आयोजित केली होती.यावेळी भगवे वादळ युवक मंडळ बेळगाव कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांचा संपूर्ण इतिहास समजावून सांगितला.
तसेच कोणता किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला आहे. गडावर कोणकोणत्या ठिकाणी मंदिरे, तलाव धान्य पेठारा , शस्त्राची कोठरी याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी देखील महाराजांचा इतिहास समजून घेत सज्जनगड,रायगड,प्रतापगडचा इतिहास जाणून घेतला त्यावेळी शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या शैक्षणिक सहलीमध्ये सहभाग घेतला होता.