This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

State

*अन्विता चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरण* 5 व 6 ऑक्टोबर रोजी बेळगाव मध्ये ऑडिशन घेतले जाणार

*अन्विता चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरण* 5 व 6 ऑक्टोबर रोजी बेळगाव मध्ये ऑडिशन घेतले जाणार
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी अस्मिता क्रिएशन्स या बेळगाव येथील चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत त्यांच्या अन्विता या नवीन मराठी व कानडी दोन्ही भाषेत येणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरचे पूजन व अनावरण उत्तर कर्नाटका चित्रपट वाणिज्य विभागाचे अध्यक्ष डॉक्टर शंकरराव सुगते सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बेळगाव मधील सर्व पत्रकारांची परिषद आयोजित करण्यात आली होती.

या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संतोष चंद्रकांत सुतार यांनी चित्रपटासंबंधीची माहिती पत्रकारांना दिली सध्या समाजात सुरू असलेल्या बलात्काराच्या व व्यसनाधीनतेच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी व वासनांध विकृतीच्या प्रवृत्तीचा कायमचा नायनाट करण्यासाठीचा विषय या चित्रपटात घेण्यात आला आहे असे सांगितले. तसेच यावेळी गेल्यावर्षी मराठीत आलेला दडपण हा चित्रपट लवकरच कन्नड भाषेत प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली दडपण या कन्नड चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरण एडव्होकेट अश्विनी ज्योतिबा नावगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अस्मिता क्रिएशनचे सर्वेसर्वा राजेश गणपती लोहार दडपण चित्रपटाचे कलाकार शशिकांत नाईक, निधी राऊळ महादेव होनगेकर त्याचप्रमाणे दडपण चित्रपटाचे एडिटर प्रशांत शेबण्णावर, दडपण चित्रपटातले पार्श्वगायन केलेले बेळगाव मधील उदयोन्मुख गायक सागर चंदगडकर, स्वाती सुतार, काजल धामणेकर, तेजस्विनी एस के, बेळगाव मधील कन्नड अभिनेते दिग्दर्शक प्रवीण सुतार गायक व अभिनेते सुरेश मोने, गायक अँथोनी डिसिल्वा तसेच बेळगाव मधील चित्रपट प्रेमी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्विता या चित्रपटाचे येत्या 5 व 6 ऑक्टोबर रोजी बेळगाव मध्ये ऑडिशन घेतले जाणार आहे त्यावेळी बेळगाव मधील जास्तीत जास्त कलाकारांनी या ऑडिशनमध्ये भाग घ्यावा व आपले नशीब आजमवावे असे आवाहन चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक संतोष चंद्रकांत सुतार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष चंद्रकांत सुतार यांनी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24