बेळगांव: अलतगा येथील नाल्यामध्ये पडून मृत्युमुखी पडलेल्या ओमकार पाटीलच्या कुटुंबीयांना कर्नाटक सरकारकडून पाच लाखाची आर्थिक मदत करण्यात आली.
सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोकाक, अथणी चिकोडीचा पूरग्रस्त भागाचा दौरा केला.सायंकाळी सांबरा विमानतळ येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मयत ओमकार पाटील यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये चा धनादेश सूपृत केला.
शनिवारी रात्री ओमकार हा आपल्या चुलत भावासोबत दुचाकीवरून कटिंग करण्यासाठी कंग्राळी खुर्द गावाकडे निघाला होता. यावेळी त्यांचा अचानक अपघात झाला आणि या अपघातामध्ये ओमकार पाटील हा नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेला. काल रविवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला होता.
या भागाचे आमदार व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या प्रयत्नातून हा निधी मयत कुटुंबीयांना देण्यात आला आहे. याप्रसंगी महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर उपस्थित होत्या.