कॅम्प मधील हाय स्ट्रीट येथे रस्ता खचल्याने खड्डा पडला असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाण्याची पाईप घालण्यासाठी एल अँड टी कंपनीने रस्त्याची खोदाई केली होती.काही दिवसापूर्वी पाईप घातल्यावर खोदाई केलेल्या ठिकाणी माती घालून डांबरीकरण पण करण्यात आले होते.पण आज एक ट्रक जात असताना हा रस्ता खचला आहे.
खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून तेथील व्यापाऱ्यांनी रस्त्यात फलक उभे केले आहेत. एल अँड टी कंपनीने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी तेथील व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे.