This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*राष्ट्र रक्षक धर्म रक्षक मराठाच*

*राष्ट्र रक्षक धर्म रक्षक मराठाच*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*राष्ट्र रक्षक धर्म रक्षक मराठाच*
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतून बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर हे 1 लाख 77 हजार मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीत मराठी मते ही खूप निर्णायक ठरली मराठी मतदारांचा कौल ज्या पक्षाकडे जातो त्या पक्षाचा खासदार हा निर्विवाद पणे निवडून येतो. याचा अनुभव आज निवडून आलेल्या पक्षाला झाला मागील वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार दिला होता त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची चांगलीच दमछाक झाली होती पण यावेळी मात्र राष्ट्र प्रथम या तत्त्वावर मराठ्यांनी आपली मते ही सक्षम आणि सुरक्षित हिंदुस्तान बनविण्यासाठी कोणत्याही लोभाला बळी न पडता सीमा भागातील तिन्ही मतदार संघातील मराठ्यांनी आपलं अमूल्य मत हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दिलं.

आणि त्यामुळेच बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला आणि हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती ही मराठ्यांच्या नसानसातच आहे. मराठ्यांच्या मतामुळेच आज आपण निवडून आलो असे उद्गार देखील भारतीय जनता पार्टीचे नेते व व माजी राज्यसभा खासदार महांतेश कवठगीमठ यांनी काढले. यांनी काढलेल्या या उद्गारामुळे मराठ्यांना हिंदुत्व शिकवणाऱ्याना एक चांगलीच चपराक बसली. निवडून आलेल्या खासदारांनी भविष्यात जातीपातीचा विचार न करता केवळ हिंदुत्व आणि राष्ट्र प्रथम या मुद्द्यावर मतदान केलेल्या मराठ्यांचा विचार नक्कीच करावा हिच अपेक्षा.
*आपलाच :- प्रशांत गोपाळ पाटील कंग्राळी खुर्द*


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24