This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*उद्या कपिलेश्वर मंदिरामध्ये शिवतांडव स्तोत्र पठाण*

*उद्या कपिलेश्वर मंदिरामध्ये शिवतांडव स्तोत्र पठाण*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एफ एचडी अर्थात फाउंडेशन फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ही संस्था मातृ शक्ती या विषयावर काम करते. जगभरातील मातांचा अभ्यास करण्यासाठी या फाउंडेशन आपल्याच चार भगिनींच्या मार्फत दिल्ली ते लंडन असा 2016 साली प्रवास केलेला आहे. 22 देशात हा प्रवास केला आणि त्या त्या देशांमध्ये आईचे महत्व काय आहे? किंवा आईची मानसिकता कशी आहे ? याविषयीचा अभ्यास केला गेला त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद महिलांच्यासाठी मातृशक्ती या विषयावर घेतली गेली .वसुधैव कुटुंबकम या अंतर्गत.

त्यानंतर 2020- 21 या कोरोना काळामध्ये तांडव करायची कल्पना पुढे आली. आणि पहिल तांडव संस्थेनं शिवतांडव हे वाराणसी मध्ये केलं . या शिवतांडव मध्ये संपूर्ण भारतभरातून जवळपास 1100 महिलांचा सहभाग होता आणि हे शिवतांडव शिकवण्यासाठी फक्त आणि फक्त ऑनलाईनचा वापर केलेला होता. पण तरीसुद्धा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तांडव मधलं दुसरं तांडव हे धनुष्यकोडी-रामेश्वरम इथं रामतांडव सादर केलं गेलं . यासाठी सुद्धा बाराशे महिलांचा सहभाग होता . त्याच्या पुढच्या वर्षी कालीतांडव हे कोलकत्ता इथे सादर केलं गेलं . यासाठी जवळपास 900 महिला हजर होत्या. 2024 जानेवारीमध्ये हंपी या ठिकाणी अंजनेय पर्वतावर हनुमान तांडव सादर केलं गेलं. ज्यामध्ये पुन्हा एकदा अकराशे महिलांचा सहभाग होता. आणि आगामी तांडव जे आमचं असणार आहे तर ते केरळमध्ये कृष्ण तांडव असणार आहे. मातृशक्तीला आवाहन करणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून FHD काम करते . ज्यामध्ये गुरु माता ही एक विशेष कल्पना आहे. ज्या शिक्षकांच्या पत्नी आहेत तर त्यांनी मातेसमान विद्यार्थ्यांच्या मध्ये काम करावं की जेणेकरून विद्यार्थी कुठेही वाईट मार्गाला जाणार नाहीत किंवा त्यांच्या मनातली जी काही खळबळ आहे जे ती आपल्या घरामध्ये बोलू शकत नाहीत, शाळेमध्ये बोलू शकत नाहीत ,

कॉलेजमध्ये बोलू शकत नाहीत , तर ती ते खळबळ आपल्या गुरु मातेसमोर मोकळेपणाने मांडू शकतील. त्यांच्याशी एक वेगळा संवाद व्हावा या दृष्टीने ही संकल्पना राबवली जाते. आणि या सगळ्याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय अशा तऱ्हेने फाउंडेशनचा काम चालतं.ए *एचडी फाउंडेशन ऑफ हॉलिस्टिक व श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवतांडव स्तोत्र व संगीताचा कार्यक्रम सायंकाळी 6 वा आयोजित केला आहे तसेच सायंकाळी 7.30 पालखी प्रदक्षिणा व महाआरती करून पवित्र श्रावण महिन्याची सांगता होणार आहे याची सर्व शिवभक्तांनी व बेळगावकर नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने अहवाल करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24