म. ए. स नेतेमंडळींची श्री पवार साहेबांची सदिच्छा भेट.
सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी निमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी माननीय खासदार पद्मविभूषण श्री शरदचंद्र पवार साहेबांचे मराठा मंदिर मंगल कार्यालय बेळगाव येथे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . याप्रसंगी श्री पवार साहेबांची महाराष्ट्र एकीकरण समिती नेते श्री रमाकांतदादा कोंडुस्कर यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान केला .
ह्या भेटीदरम्यान त्यांना सीमा प्रश्न विषयी सरकार वरती दबाव आणून लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून सहकार व्हावा अशी विनंती केली. यांच्यासोबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघडगी, देवस्थान अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, सागर पाटील ,महादेव पाटील उपस्थित होते.