विश्व हिंदू परिषद च्या कार्यात हिंदूंनी सहभागी व्हावे प्रा.राजेंद्र ठाकूर
विश्व हिंदू परिषद च्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विरूपाक्ष लिंग समाधी मठ येथील हिंदू संघटन मेळावा ते बोलत होते.सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते दीप्रज्वलन व पाहुणे यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी प्रा.राजेंद्र ठाकूर म्हणाले की विश्व हिंदू परिषद संघटना नसती तर आज आपण आयोध्या मधील भव्य अस श्रीराम मंदिर पाहू शकलो नसतो. विश्व हिंदू परिषद चे कित्येक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे त्यांच्या त्याग आणि परिश्रम हे प्रत्येक हिंदूंनी जानले पाहिजे संघटनेने स्वतःसाठी काहीच केले नाही अगदी त्याच पध्दतीने निपाणी आणि निपाणी परिसरातील हिंदूं तरुण तरुणींनी मोठ्या संख्येनं प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेत सहभागी होऊन देव, देश, धर्माचे कार्य करावे.
आपल्या देशात भष्टाचार, लव्ह जिहाद,लैंडजिहाद, गोहत्या, बलात्कार असे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. असे राष्ट्राविरोधी प्रकार थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदू तरुण तरुणींनी विश्व हिंदू परिषद चां कार्यात सहभागी होणे महत्वाचे आहे आणि फक्त सहभाग होऊन न थांबता प्रत्येक गावात विश्व हिंदू परिषद च्या शाखेची स्थापना करण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण सध्याचा तरुण तरुणी सोशल मीडिया,मोबाईल, व्यसने, पाश्चात्य संस्कृती या सर्वांच्या आहारी जात आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापरामुळे तरुणांसोबतच लहान मुलेही खेळ तसेच मित्र व आईवडिलांपासून लांब जात आहेत थोरामोठ्यांचा मांन राखणे म्हणजे आजच्या युवकांना अपमान वाटत आहेत. यामुळे समाजात चिंता वाढू लागली आहे.
ही चिंता दूर करण्यासाठी आणि धर्म, संस्कृती, राष्ट्र रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद तरुणांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती, धर्म भक्ती जागृत करण्याचे काम करत आहे. असे प्रतिपादन हिंदू धर्म अभ्यासक प्रा. राजेंद्र ठाकूर सर यांनी निपाणी येथे श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
विश्व हिंदू परिषद चें जिल्हा अध्यक्ष प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी सांगितले की हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी युवकांनी क्रांतीचा यज्ञ केला पाहिजे, ज्याप्रमाणे दे देशातील शूरवीर,महान देशभक्ताने, क्रांतिकारक यांनी परकीय आक्रमणाविरुद्ध लढा दिला,इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. व भारत मातेचे रक्षण केले त्याच प्रमाणे या महान राष्ट्र भक्ताच्या विचाराने पुढे जात देशाला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी युवकांनी क्रांतीचा यज्ञ केला पाहिजे, तसेच देशातील तरुणींच्या वर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे यासाठी तरुणींनी संरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे यासाठी आपण संघटनेच्या वतीने ठीक ठिकाणी मोफत प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करणार आहोत जर कोणत्याही तरुणीला कोणीही त्रास देत असेल तर त्यांनी हिंदू हेल्प लाईन ला संपर्क करावा हिंदू हेल्प यांचे कार्यकर्ते तिथेच त्याचा आध्दल घडवतील पण तरुणींनी स्वतःहून अशा समाजातील नराधमाना शिक्षा केली पाहिजे यासाठी काही मदत हवी असल्यास आपण त्यांच्या पाठीशी सदैव आहोत असे प्रतिपादन प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.
विश्व हिंदू परिषद चे जिल्हा मंत्री सुजित कांबळे यांनी विश्व हिंदू परिषदची माहिती सांगते वेळी सांगितले की विश्व हिंदू परिषद ची स्थापना १७ ऑगस्ट १९७४ मध्ये केली गेली आज त्याला 60वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने देश भरात हीरक महोत्सव म्हणून साजरा होत आहे विश्व हिंदू परिषद ही संघटना सेवाकार्य करणारी देशातील एक स्वयंसेवी संस्था आहे. देशातील महान साधू संत, महंत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य चालत आहे.हिंदू समाजातील उच्चनीचता, भेदाभेद दूर करून समग्र समाजाला एका समान पातळीवर संघटित करण्याचे कार्य करते. भारतासह संपुर्ण विश्वातील हिंदूंची सेवा, सुरक्षा व संस्कार करणे हा उद्देश समोर ठेवून विश्व हिंदू परिषद अखंड कार्य करत आहे. असे सांगितलेया वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन भक्ती कुलकर्णी प्रतिक्ष माने यांनी केले तर प्रास्ताविक श्वेता हिरेमठ यांनी केले
यावेळी विश्व हिंदू परिषदचे दीपक भडगावे, सागर श्रीखंडे
मातृ शक्तीच्या सुचित्रा कुलकर्णी, रानडे ताई
दुर्गा वाहिंची संगीता चव्हाण,
जयश्री सावंत, समृध्दी पाटील, मयुरी कांबळे, श्रावणी पाटील, गीता गुरव, प्रतिक्ष माने,जयश्री पाटील,चंद्रभागा राणामाले, रोहिणी कुलकर्णी, गायत्री शिंदे, बाळकृष्ण गजबर, सतीश पाटील, विक्रम पाटील, विकास कुलकर्णीसह खडकलाट, नावनिहाल चिकलव्हल, शिरगुप्पी गोदुगोपी, शेडूर, पांगिर, कोडणी, यमगर्णी, बुदीहाळ, बुगटे आलूर्, हिटनी, शीपुर, सौंदलगा, कुन्नूर, कसणार, बारवाड,नाईगलज सह निपाणी परिसरातून मोठ्या संख्येने हिंदू तरुण तरुणी उपस्थित होत्या