बेळगाव:संकेश्वर येथील खासगी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही व शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. याकरिता खाजगी भाजी मार्केट बंद करून एपीएमसी येथे भाजी मार्केट स्थलांतरित करावे या मागणी करिता हरित आणि राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने आज बेळगाव चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.याप्रसंगी बोलतांना पुजारी म्हणाली की मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कोणत्याही सरकारने दिली नाही. संकेश्वर येथील खासगी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. हे खाजगी मार्केट बंद करून एपीएमसी मध्ये भाजी मार्केट स्थलांतरित करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.