This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*कबड्डी स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट.*

*कबड्डी स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कबड्डी स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट.

बेळगाव ता,15,शिंदोळी येथील देवेंद्र जिंनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खानापूरच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने दुहेरी मुकुट तर हनीवेल स्कूल व देवेंद्र जीनगौडा शाळेने ही विजेतेपद पटकाविले.
देवेंद्र जिंगगौडा शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेतील प्राथमिक मुलांच्या अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 3 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले, तर मुलींच्या गटातील अंतिम लढतील देवेंद्र जिंगगौडा स्कूलने शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा 6 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले, तर माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलने देवेंद्र जिनगौडा स्कूलचा 4 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत हनिवेल इंग्लिश मीडियम स्कूलने शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा 6 गुणांनी पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले वरील विजेते संघ आगामी होणाऱ्या विद्याभारती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वाडकर, उदय संकण्णावर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, या स्पर्धेसाठी पंच म्हणून गंगा सानीकोप्प ,मयुरी पिंगट ,यश पाटील, शिवकुमार सुतार ,उमेश पट्टेद, नारायण गावडे ,सागर कोलेकर यांनी काम पाहिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24