This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून सात जण ठार*

*राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून सात जण ठार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील शिरूर येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून सात जण ठार झाले तर दरडी खाली सापडलेल्या अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. दरडी खाली गुदमरून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरड कोसळल्यामुळे एक गॅसची वाहतूक करणारा टँकर महामार्गाच्या बाजूने वाहत असलेल्या गंगावळी नदीत वाहून गेला असून टँकर चालक आणि क्लिनर बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.मुसळधार पावसामुळे गंगावळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी वेगाने वाहत आहे.

सोमवारी रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ठार झालेले पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. अंकोला कुमठा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक दरड कोसळल्याने ठप्प झाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अग्निशामक दल आणि एन डी आर एफ ची टीम दरड हटवण्याच्या आणि गाडले गेलेल्यांचा शोध घेण्याच्या कार्यात गुंतली आहे.मुसळधार पावसामुळे शोध कार्यात अडचण येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24